Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात कवयित्री बहिणाबाई चौधरी पुण्यतिथी निमित्त अभिवादन

जळगाव प्रतिनिधी | निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त म.सा.प.पुणे शाखा-चाळीसगाव कार्यालयात अभिवादन सभा संपन्न झाली.

शुक्रवार दि. ३ डिसेंबर रोजी निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त म.सा.प.पुणे शाखा-चाळीसगाव कार्यालयात सायंकाळी ५.३० वाजता अभिवादन सभेचे आयोजन केले होते. शाखेचे कार्याध्यक्ष कवी-मनोहर ना.आंधळे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या अभिवादन सभेत उपाध्यक्षा अँड.सुषमाताई पाटील, कार्यवाह प्राचार्य पी.एस.चव्हाण, कार्यकारिणी सदस्य अनुक्रमे रामचंद्र गोसावी, कवी रमेश पोतदार, पर्यावरणमित्र- शालिग्राम निकम व राकेश बोरसे आणि रसिक श्रोते उपस्थीत होते.

याप्रसंगी प्राचार्य पी.एस.चव्हाण, अँड.सुषमा पाटील, शालीग्राम निकम व कवी रमेश पोतदार यांचेसह अभिवादन सभेचे अध्यक्ष कवी मनोहर आंधळे यांनी कवयित्री बहिणाबाईंच्या जीवनाचा व काव्यलेखनाचा धांडोळा घेत मनोगते व्यक्त केलीत. मनोहर आंधळे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची मन वढाय वढाय ही कविता तर कवयित्री अँड.सुषमा पाटील यांनी बहिणाईंना समर्पित स्वरचित कविता सादर केली.

Exit mobile version