Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धनाजी महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरूंना अभिवादन

dhananji clg

फैजपूर प्रतिनिधी । धनाजी नाना महाविद्यालयात नेहरू अध्ययन केंद्राच्या वतीने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.एस.के. चौधरी यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. भारताचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताचे रचयिता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताला विश्वात एक वेगळे स्थान प्राप्त करून दिले. त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही असे गौरवोद्गार तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉ.सुधाकर चौधरी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू जयंती तसेच बाल दिवसाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. तसेच त्यांनी पंडित नेहरू यांचा जीवन परिचय करून दिला. यासोबत आधुनिक भारताच्या जडणघडणीत पंडित जवाहलाल नेहरू यांचे योगदान यावर सविस्तर विवेचन केले.

समन्वयक प्रा. डॉ. सतीश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.पी.आर चौधरी, उपप्राचार्य प्रा.ए.जी सरोदे, प्रा.डॉ.जगदीश पाटील, प्रा.डॉ.जी.एस. मारतळे, प्रा. टोके, प्रा.इंगळे, प्रा.बढे, नितीन सपकाळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ तायडे, शेखर महाजन, चेतन इंगळे, अरुण सौंदाने यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version