Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपंग बांधवांसाठी भव्य मोफत जयपूर फूट, कॅपिलर्स वितरण शिबिर (व्हिडीओ)

जळगाव’ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नुकत्याच संपन्न झालेल्या शिवजन्मोत्सवाच्या आणि रेड स्वस्तिकच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील अपंग बांधवांना जयपूर फूट, कॅलिपर्स लावून चालते करून स्वयंसिद्ध करण्याच्या हेतूने मोफत जयपूर फुट कॅपिलर्स, क्रचेस वितरण शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे.

दिनांक ९ ते ११ मार्च दरम्यान जिल्ह्यातील अपंग बांधवांना जयपूर फूट, कॅलिपर्स लावून चालते करून स्वयंसिद्ध करण्याच्या हेतूने मोफत जयपुर फुट कॅपिलर्स, क्रचेस वितरण शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती रेड स्वस्तिकचे सहा व्यवस्थापक अशोक शिंदे, रेड स्वस्तिकचे जिल्हाध्यक्ष अॅड.राजेश झाल्टे यांनी आज आदिती साड्या येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

समाजहिताच्या दृष्टीकोनातून यापूर्वीही तीन ते चार हजार अपंग बांधवांना चालतं करून स्वयंसिद्ध करण्यात आला असून या वर्षी हा उपक्रम ९ ते ११ मार्च या तारखेदरम्यान रेड स्वस्तिक कार्यालय, हॉटेल प्रीतमच्या मागे, भुसावळ हायवे, अजिंठा चौफुलीजवळ आयोजित करण्यात आला आहे. दिनांक ९ आणि १० मार्च दरम्यान पेशंटचे मोजमाप करण्यात येईल दिनांक ११ रोजी भव्य कार्यक्रमादरम्यान वितरण करण्यात येईल. यासाठी अपंग बांधवांनी दोन फोटो आधार कार्डची झेरॉक्स सोबत आणावी. या उपक्रमाला रेड स्वस्तिक व्यवस्थापक यांचे मार्गदर्शन लाभले.

पत्रकार परिषदेला रेड स्वस्तिकचे महाव्यवस्थापक रोशन मराठे, नंदू रायगडे, रेड स्वस्तिक चे मार्गदर्शक शशिकांत धांडे, डॉ.गणेश रोटे. डॉ.अनिल पाटील, प्रकल्प संचालक डॉ.धनंजय बेंद्रे. कार्याध्यक्ष जे.बी.पाटील, सचिव डॉ.स्नेहल फेगडे, विनोद कोळपकर, कोषाध्यक्ष एडवोकेट एस.एस.पाटील, महानगरप्रमुख संजय काळे, आनंदराव मराठे, दिलीप गवळी, सतीश देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक विनोद देशमुख, शरद पांडे, डॉ.मनिष चौधरी, अॅड.महेश भोकरीकर. डॉ.प्रमोद आमोदकर, सत्यनारायण खटोड, धनंजय काळे, मनीष चव्हाण, डॉ.गणेश पाटील, योगेश काळे, अमित पाटील, मेजर किरण देखणे, आनंदा साळुंके, महेश पाटील, संजय आवटे, राजेंद्र पाटील, सोनू पाटील, यश पांडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

पत्रकार परिषदेला रेड संस्थेचे सह महाव्यवस्थापक अशोक शिंदे आणि रोशन मराठे यांना महामहिम राज्यपालांच्या हस्ते प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. या शिबिराचा जास्तीत जास्त अपंग बांधवांनी लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे.

व्हिडिओ लिंक
https://fb.watch/box3BVNzmd/

Exit mobile version