Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथील ग्रामविकास अधिकारी मच्छिंद्र पाटील यांची सेवानिवृत्ती

sewan nivrutti

यावल (प्रतिनिधी) । येथील पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले मच्छिंद्र गंगाराम पाटील हे आपल्या ३२ वर्ष सेवे नंतर स्वच्छेने सेवानिवृत्त झालेत.

यावल तालुक्यातील चिंचोली ग्रामपंचायत मध्ये ५ वर्ष, मनवेल येथे ५ वर्ष, बोरखेडा येथे ६ वर्ष, आणी दहिगाव येथे ग्रामविकास अधिकारी म्हणुन ३ वर्ष पुर्ण केल्यावर त्यांनी कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी सेवानिवृत्तीच्या काही दिवसा आदीच स्वच्छेने सेवा निवृत्तिचा निर्णय घेवुन ते निवृत झालेत. मच्छिंद्र गंगाराम पाटील हे मुळ सनपुले, मितावली तालुका चोपडा येथील रहिवाशी त्यांनी १९८६ मध्ये ते सर्वप्रथम भुसावळ पंचायत समितीमध्ये ग्रामसेवक या पदावर त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेची सुरुवात करून ३ वर्षापर्यंत सेवा बजावली, चोपडा पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात त्यांनी १० वर्ष विविध ग्रामपंचायत समितींवर सेवा दिली. त्यानंतर त्यांनी यावल पंचायत समिती मध्ये ग्रामविकास अधिकारी या पदावर विस वर्ष सेवा दिल्यानंतर ते नुकतेच प्रकृतीच्या कारणाने त्यांनी काही दिवस आदीच आपली सेवानिवृती जाहीर केली.

नुकताच पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या सेवा पुर्ति सोहळयात त्यांना माजी आमदार शिरिषदादा चौधरी, प्रभारी गट विकास अधिकारी किशोर सपकाळे, सभापती पल्लवी चौधरी, यावल तालुका ग्रामसेवक संघाचे अध्यक्ष रूबाब तडवी व त्यांचे सर्व सहकारी व पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आले.

Exit mobile version