Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्रामपंचायत कार्यालयात तोडफोड; एकावर गुन्हा दाखल

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पिळोदा खुर्द येथील ग्रामपंचायतीचे कार्यालयाचे कुलूप तोडून एकाने कंप्यूटर साहित्याची नासधूस करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात आज रोजी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय आहे. या कार्यालयात मध्यरात्री संशयित आरोपी देवेंद्र रतन कोळी रा. पिळोदा खुर्द ता. यावल याने ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालयातील संगणक मॉनिटर प्रिंटर आणि कीबोर्ड असा एकूण ६ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमालाची नासधूस केली.

याप्रकरणी यावल आज गुरुवार, दि. २१ जुलै पोलीस ठाण्यात शिपाई हेमंत जोशी यांनी धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी देवेंद्र रतन कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सिकंदर तळवी करीत आहे.

Exit mobile version