शाळेतील बंद खोलीतून धान्याची चोरी

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शाळेतील बंद खोलीतून विद्यार्थ्यांसाठी वाटपासाठी ठेवण्यात आलेले शासकीय धान्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा शहरातील जागृती विद्यालयाच्या एका खोली विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार म्हणून तांदूळ, तूरडाळ, मसूरडाळ आणि मटकी असा मुद्देमाल ठेवला आहे. २ मे रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शाळेतील बंद खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश करत हा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शिक्षक राजेंद्र वाणी यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार कैलास पाटील करीत आहे.

Protected Content