Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गो. से. हायस्कूल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सत्कार समारंभ

पाचोरा प्रतिनिधी । प्रजासत्ताक दिनानिमित्त गो. से. हायस्कूल येथे ध्वजारोहण व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

ध्वजारोहण व सत्कार अशा या संयुक्त कार्यक्रमात तांत्रिक विभागाचे चेअरमन तथा नगरसेवक वासुदेव महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांचे स्पर्धा परीक्षा “सारथी” या पुस्तकाच्या प्रकाशना बद्दल संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांचा शालेय समिती चेअरमन खलील  देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यांच्या समवेत आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांचा देखील सत्कार करण्यात आला. इयत्ता आठवीतील शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा देखील याप्रसंगी पालकांसमवेत सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांनी मनोगतातून स्पर्धा परीक्षेचे महत्त्व व पुस्तक प्रकाशनाचा उद्देश स्पष्ट केला तर खलील देशमुख यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले. या संयुक्त कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे माजी मुख्याध्यापक एस. टी. अहिरे, एस. एच. पवार  माजी पर्यवेक्षक पी. डी. वाणी, शांताराम चौधरी, पी. जे. पाटील, अनिल कासार, अशोक पाटील, बापू चौधरी, शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. ठाकरे, ए. बी. अहिरे सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी कार्यालय अधीक्षक अजय सिनकर किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील उपस्थित होते. सकाळ व दुपार सत्रातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी तर उपस्थितांचे आभार ए. बी. अहिरे यांनी मानले.

 

Exit mobile version