Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमदार सावकारेंच्या पाठपुराव्याने भुसावळ मतदारसंघासाठी २.८० कोटींचा निधी

भुसावळ प्रतिनिधी । आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नांनी ग्रामीण भागातील गावांसाठी २.८० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यामुळे मूलभूत सुविधा पुरवणे अंतर्गत भुसावळ तालुक्यातील डांबरी रस्ते, सामाजिक सभागृह, स्मशान भूमी बांधकामांसाठी ग्राम विकास व पंचायत राज विभागामार्फत २ कोटी.८० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला. तसेच वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेअंतर्गत ५० लक्ष रुपये किमतीच्या कामांना मंजुरी मिळाली विकास कामांमध्ये तळवेल ता. भुसावळ येथील पाण्याची टाकी ते शाळेपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे १० लक्ष, बेलखेडा ता. भुसावळ येथे अंतर्गत रस्ते ५लक्ष, कुर्‍हे पानाचे ता. भुसावळ येथील स्मशान भूमी मध्ये बैठक व्यवस्थेसाठी ५ लक्ष, कंडारी ता. भुसावळ येथील वार्ड क्रमांक ५ मध्ये सर्वे नंबर १३२ /१ ,१३२/२५ मध्ये रस्त्याचे डांबरीकरण करणे १० लक्ष, ओझरखेड ता. भुसावळ येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे १० लक्ष, शिंदी ता. भुसावळ येथे रस्त्याचे डांबरीकरण करणे १० लक्ष, बेलखेडा ता. भुसावळ येथे रस्ते अंतर्गत काँक्रिटीकरण करणे १० लक्ष, कन्हाळे बु. ता. भुसावल व्हीआयपी कॉलनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे १० लक्ष, जाडगाव ता. भुसावळ येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे१० लक्ष, सुसरी ता. भुसावळ येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे १५ लक्ष, पिंपळगाव ता. भुसावळ येथे वाचनालय बांधकाम करणे १० लक्ष, फुलगाव ता.भुसावळ येथे अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे २० लक्ष, कठोरा बु ता.भुसावळ येथे सामाजिक सभागृह बांधणे १० लक्ष, गोभी ता. भुसावळ येथील स्मशानभुमी रस्ता डांबरीकरण करणे ५ लक्ष, आचेगाव ता. भुसावळ नवीन वस्तीतील रस्ते डांबरीकरण करणे १५ लक्ष, बोहर्डी ता. भुसावळ येथे स्मशानभूमी चे बांधकाम करणे १५ लक्ष, वराडसिम ता. भुसावळ येथील तळेभाग स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे १५ लक्ष, वेल्हाळा ता. भुसावळ येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे १० लक्ष, मोंढाळे ता. भुसावळ येथे सामाजिक सभागृह बांधणे १० लक्ष, गोजोरे ता.भुसावळ येथे अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे १५ लक्ष, सुनसगाव ता.भुसावळ येथे अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे १५ लक्ष, मांडवे दिगर ता. भुसावळ येथे अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे १० लक्ष, साकरी ता.भुसावळ येथे अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे १५ लक्ष, खडके ता.भुसावळ सभागृहाजवळ पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लक्ष,असे एकूण दोन कोटी अशी लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यासोबत मांडवे दिगर येथे रस्ता काँक्रीट व गटार बांधकाम १०लक्ष, भिलवडी १३लक्ष, मुछड तांडा १३ लक्ष, महादेव माळा १३ लक्ष, रुपयाचा निधी वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेतून मंजूर करण्यात आला.

Exit mobile version