Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सत्ताधाऱ्यांनी गाळे प्रश्नांवर ठोस भूमिका घ्यावी : नितीन लढ्ढा

WhatsApp Image 2019 07 20 at 8.29.25 PM

जळगाव, प्रतिनिधी । गाळेधाकरांचा प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनी ठोस भूमिका घ्यावी असे मत माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी मांडले. गाळेधारकांकडून थकबाकी वसुल करा अन्यथा निर्लेखीत करा. काहीतरी सोक्षमक्ष लावण्या पेक्षा नुसते कागदे रंगवूले जात असून मुदत संपलेल्या गाळ्यांचा खेळ हा मोठा करून ठेवला आहे जात असल्याचा आरोप नितीन लढ्ढा यांनी स्थायी सभेत केला.

महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत दुसऱ्या मजल्यावर सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी सभा झाली. याप्रसांगी आयुक्त डॉ. उदय टेकाळे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, उपायुक्त डॉ. लक्ष्मीकांत कहार, मुख्यलेखाधिकारी संतोष वाहुळे, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. नितीन लढ्ढा यांनी पालिकेच्या मुदत संपलेल्या गाळेधारकांची ३३६ कोटीची थकबाकीचा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्‍नाचा पेच सुटत नसल्याने गाळेधारक तर महापालिका प्रशासन त्रस्त झाले आहे. महापालिका व राज्यशासनाकडून गाळेभाडे वसुलीबाबत धोरण ठरत नसेल तर किमान १५१ च्या कलमनुसार स्थायी समितीला ही थकित रक्कम वसुल होत नसेल तर निर्खेलीत करण्याचा अधिकार आहे. तसा ठराव करा, यावर काहितरी निर्णय घ्या असा असे सांगितले. यावर सत्तेत दहा महिन्यापूर्वी आलो असून यापुर्वी तुमचीच सत्ता होती तेव्हा का हा निर्णय घेतला नाही असे सत्ताधाऱ्यांनी म्हणताच चांगलाच गोंधळ झाला. तसेच भाजप गटनेते भगत बालाणी यांनी पाच पट दंडचा ठरावावर महापालिका प्रशासानाने काय केले. शासनाकडे विखंडणाकडे का पाठविला नाही पंधरा दिवसात यावर निर्णय घ्या अशी विनंती केली.

पाच पाट दंड ही नुकसान भरपाई :  आयुक्त
महापालिकेच्या मुदत संपलेल्या संकुलातील गाळेधारकांची २०१२ मुदत संपली. अनधिकृत वापर करतांना  अटीशर्ती असतात त्यात ८१ब ची कारवाई मनपाने नोटीस देवून केली आहे. गाळे थकबाकी वसुलीत रेडीरेकन दर, महापालिका कर तसेच थकबाकीवरील वर्षाला २४ टक्के शास्ती अशी लावली आहे. तर पाच पट दंड हा दंड नसून ती नियमानुसार लावण्यात येणारी भरपाई आहे अशी माहिती आयुक्तांनी सभागृहाला दिली.केंद्रात, राज्यात तसेच महापालिकेत भाजपची सत्ता असून गाळे प्रश्‍न का मार्गी लावत नाही असे आरोप शिवसेना सदस्य लढ्ढा यांनी केले. यावेळी भाजपचे सदस्य सुनील खडके, गटनेते भगत बालाणी, चेतन सनकत, सदाशिव ढेकळे यांनी शाब्दीक पटवार करत यापूर्वी तुमची सत्ता होती. तेव्हा ठराव का केला नाही. तसेच सभापती मराठे यांनी आधी बाळ जन्माला घालयचे आणि नंतर दुसऱ्याला पोसायला द्यायचे असा प्रकार आहे.  दरम्यान, शहरातील खड्डे बुजविण्यासाठी युवा ब्रिगेडियर्स फाउंडेशनतर्फे गुरुवारपासून साखळी उपोषणास प्रारंभ केला होता. आज त्यांना सभागृहात संपूर्ण खड्डे बुजविण्याचे आश्वासन देण्यात आल्याने त्यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले.

Exit mobile version