Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तत्कालीन राज्यपाल फालतू माणूस – असीम सरोदे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला आमदार अपात्रतेच्या निकाल हा कसा राजकारण करत दिला यावर ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे स्पष्टीकरण दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. वकील असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये कायदेशीर बाजू सांगताना महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

कायद्याचा अर्थ कसा काढायचा. कोणताच कायदा मनाला वाट्टेल तसा अर्थ काढा सांगत नाही. आम्हाला कायद्याचा अर्थ कसा काढायचा हे शिकवलं जातं. मॅक्सेवेल यांचं पुस्तक आम्ही रेफर करतो. ज्या शब्दात म्हटलंय तसाच कायदा. त्याचा काही अर्थ काढायचा नाही. त्यातून काही अर्थ निघत नसेल तर कायद्याचा उद्देश लक्षात घ्यायचा आहे. पक्षांतर बंदी कायद्याचा उद्देश काय तर पक्षांतर होऊ नये हा त्याचा अर्थ आहे. संविधानाचं उद्देश लक्षात घेऊन अर्थ काढला पाहिजे. तसेच सर्वसमावेशक अर्थ काढला पाहिजे. या चार पाच तत्त्वांवर नार्वेकर यांनी बुद्धी लावली का पाहिलं पाहिजे. जे न्यायाधीश होणार आहे ते असं वागणार असतील तर कायद्यावर कुणाचा विश्वास राहील का? असा सवाल असीम सरोदे यांनी केला.

राज्यपालांनी सरकर उलथवून लावण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली, अशा शब्दात घटनात्मक पदावर बसलेलल्या व्यक्तीवर सर्वोच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले होते. याबाद्दल बोलताना सरोदेंनी राज्यपालांना फालतू माणूस असं म्हटलं होतं. तेव्हा भगत सिंह कोश्यारी राज्यपदावर होते.

अपात्रतेचं प्रकरण थेट त्यांच्याकडे गेलं नाही. ते आधी सर्वोच्च न्यायालयात गेलं. सर्वोच्च न्यायालयाने जे निरीक्षणं नोंदवली आहेत, ते पाहिले पाहिजे. त्याचा विचार करणं नार्वेकर यांच्यावर जबाबदारी होती. नार्वेकरांनी जो निर्णय घेतला त्यात शिंदे यांना नेता म्हणून मान्यता दिली हे चुकीचं आहे. निवडणूक आयोगाने काहीही निर्णय दिला केस सुरू असताना निवडणूक आयोगाने जो काही निर्णय दिला असेल त्याचा कोणताही प्रभाव न ठेवता निर्णय द्यायचा आहे. विधीमंडळ पक्ष व्हीप ठरवू शकत नाही. निवडून आलेले आमदार ठरवू शकत नाही. मूळ पक्षच व्हीप ठरवतात. दहाव्या परिशिष्टासंबंधात निर्माण झालेल राजकीय पक्षाने ठरवलेला व्हीप या आधारेच निर्णय घेतला पाहिजे, असंही असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version