Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गण गण गणात बोते ! : राज्यपालांनी घेतले गजानन महाराजांचे दर्शन

शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यपाल रमेश बैस यांनी आज शेगाव येथे श्री संत गजानन महाराज मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेतले.

राज्यपाल रमेश बैस आज शेगावात दर्शनासाठी आले होते. प्रारंभी राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मंदिर प्रशासनातर्फे औक्षण करून स्वागत करण्यात आले. श्री. बैस यांनी सुरुवातीला समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर श्रींच्या गादीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिर परिसरात मंदिराला मिळालेली देणगी व मंदिरातर्फे राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रम आणि समाजपयोगी विकासकामांची माहिती घेतली. मंदिर प्रशासनातर्फे निळकंठ पाटील यांनी राज्यपाल श्री. बैस यांचा सत्कार केला.

यावेळी राज्यपाल रमेश बैस यांच्या समवेत आमदार आकाश फुंडकर, विभागीय आयुक्त निधी पांण्डेय, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते.

Exit mobile version