Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मंत्रीमंडळाच्या खातेवाटपाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मंजूरी

bhagat singh koshyari 1567320794

 

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मंजुरीसाठी रात्री 9.45 वाजता राजभवनवर रवानाही केली होती. राज्यपालांनी स्वाक्षरी करून ही यादी मंजुर केली आहे.

 

शनिवारी संध्याकाळी राज्यपालांकडे महाविकासआघाडीच्या सरकारच्या खातेवाटपाची संपूर्ण यादी देण्यात आली होती. खातेवाटपाला आधीच उशिर झाल्यामुळे सरकारवर टिका होत होती. अशातच राज्यपालांनी शनिवारी संध्याकाळपर्यंत या खातेवाटपाच्या यादीवर स्वाक्षरी केली नव्हती. त्यानंतर आज रविवार असल्यामुळे मंजुरी होईल की नाही यात शंका होती. मात्र अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी स्वाक्षरी करून या महाविकासआघाडीच्या सरकारच्या खातेवाटपाला मंजुरी दिली आहे.

Exit mobile version