Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सरकारला राज ठाकरेंची भीती वाटते! संजय निरूपम

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सरकारला राज ठाकरेंची भीती वाटते,  त्यामुळेच त्यामुळे १ मे च्या औरंगाबाद सभेसाठी शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.

राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादेत सभा घेऊन भोंग्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यांनी मशिदींतील भोंगे काढण्याची राज्य सरकारने कारवाई केली नाही, तर मनसेचे कार्यकर्ते मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवतील असा इशारा दिला होता. यावर राज्यातील जातीय तणाव भडकवण्यापासून रोखणे आवश्यक आहे. औरंगाबाद पोलिसांनी तेथील सभेसाठी १६ अटी घातल्या होत्या. त्यापैकी १२ अटींचे उल्लंघन केल्याबद्दल राज ठाकरेंच्या अटकेची मागणी काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केली आहे.

राज ठाकरे यांच्या विरोधात दोन न्यायालयांचे अजामीनपात्र वॉरंट  असून अद्याप मुंबई पोलिसांकडून कोणतीही कारवाई न करण्यात आलेली नाही. देशात आणि राज्यात कायद्याचे राज्य आहे. कोणी कायद्याला आव्हान देत असेल, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी,

राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही, हे उत्तर प्रदेशातील भाजपाच्या खासदाराचे वक्तव्य ऐकले असून या मताशी मी सहमत नाही. अयोध्याला जाण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण राज ठाकरे अयोध्येला जात आहेत त्यांनी हे लक्षात घ्यावे कि त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. त्यामुळे अयोध्येला जाण्याआधी त्यांनी या लोकांची माफी मागायला हवी, असेहि निरुपम म्हणाले

Exit mobile version