Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आंबापाणी पाडयावर वादळी वाऱ्यात घर कोसळून मृतांच्या वारसांना शासनाची मदत

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबाचा अचानक आलेल्या वादळी वाऱ्या घर कोसळून यात चार जणांचा दुदैवी मृत्यु झाला होता या कुटुंबाच्या वारसास प्रत्येकी चार लाख रूपये प्रमाणे १६ लाख रूपयांची शासकीय मदत प्राप्त झाली असल्याची माहिती तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दिली आहे.

यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम आंबापाणी (थोरपाणी पाडा) या क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी नानसिंग गुला पावरा यांच्या पत्नी सोनुबाई नानसिंग पावरा व त्यांच्या कुटुंबातील मुलगा रतिलाल पावरा व मुलगी बालीबाई पावरा दोन लहान मुलांचा २६ मे च्या रोजी रात्री ८ .३० वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात घर कोसळुन त्यात गुदमरून अत्यंत दुदैवी असा त्यांचा मृत्यु झाला होता. दरम्यान या आदिवासी कुटुंबाच्या मृत्यु नंतर नानसिंग गुला पावरा यांच्या कुटुंबातील सुदैवाने बचावलेला त्यांच्या ८ वर्षाच्या शांतीलाल पावरा या मुलास शासकीय पातळीवर भरीव अशी शासनाची मदत मिळावी याकरीता महसुल प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या आदेशाने फैजपुर विभागाच्या प्रांत अधिकारी देवयानी यादव, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी विशेष लक्ष देत या आदिवासी अनाथ झालेल्या शांतीलाल पावरास शासनाच्या मदतीसाठी लागणारी आवश्यक ती शासकीय दाखले त्यास मिळुन दिले. त्यामुळे अनाथ झालेल्या अक्षय पावरा यास केन्दीय क्रिडा व युवक कल्याण मंत्री ना .रक्षाताई खडसे व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ग्रुलाबराव पाटील व महाराष्ट्र राज्याचे पुर्नवसन मंत्री ना.अनिल पाटील आणि आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने अनाथ झालेल्या आदिवासी मुलास तात्काळ शासकिय मदत मिळण्यास सहकार्य लाभले .

Exit mobile version