Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वढोदा येथे ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम संपन्न

मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंडस वृत्तसेवा । तालुक्यातील वढोदा येथे महाराष्ट्र शासन अंतर्गत ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यानी उपस्थित नागरीकांशी चर्चा करुन मार्गदर्शन केले.

यावेळी तहसीलदार श्वेता संचेती, शिवसेना उपतालुका नवनीत पाटील, सरपंच सपना खिरोलकर, उपसरपंच रंजना कोथलकर, तलाठी गायकवाड,  ग्रामसेवक, कोतवाल, शहर प्रमुख पंकज पांडव, पुंडलिक सरग, गण प्रमुख नारायण पाटील, सतीश नागरे, गट प्रमुख जावेद , सो.मि.सेल विभागप्रमुख दीपक वाघसर, युवासेना शहर प्रमुख अविनाश वाढे आदींची उपस्थिती होती.

तालुक्यातील कुऱ्हा वडोदा येथे पुरवठा विभाग ‘महा राजस्व अभियाना’तर्गत ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात पुरवठा विभागामार्फत देण्यात येणार्‍या सर्व सुविधा गाव पातळीवर उपलब्ध करून देणे करता हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये प्राधान्य कुटुंब योजना, अंत्योदय अन्न योजना, नाव कमी करणे व वाढवणे तसेच जातीचा दाखला व जीर्ण झालेल्या शिधापत्रिका शिबिराच्या ठिकाणी तात्काळ बदलून देणे. आदी. बाबींवर माहिती देण्यात आली. आमदार चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व तात्काळ निवारणही शासन दरबारी करून दिले. या कार्यक्रमात गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेतला.

यावेळी रशीद तड़वी, विश्वास पाटील, अण्णा पवार, दीपक पवार, इमरान हाजी, प्रमोद वाघमारे, उद्भव कोथलकर, श्रवण धाडे, राहुल खिरलकर, रितेश मूलतकर, गणेश सोनवणे, छोटू पाटील, संदीप डीवरे, काशीनाथ वानखेड़े, नंदलाल भोसले, गजानन इंगले तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version