ब्रेकींग : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वादाच्या भोवर्‍यात सापडणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान मोदी यांच्याकडे सुपुर्द केला आहे.

राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपुर्द केला आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याचा राज्यपाल म्हणून केलेला कार्यकाळ हा आपल्या कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षण असून आता यापुढील वेळ हा चिंतनात घालविण्याचा मानस असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या राजीनामापत्रात केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भगतसिंह कोश्यारी हे अनेकदा वादात सापडले होते. अगदी त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली होती. यामुळे त्यांची गच्छंती अटळ असल्याचे मानले जात होते. या अनुषंगाने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या अलीकडच्या दौर्‍यात राजीनामा पत्र सुपुर्द केले असून राज्यपालपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता त्यांच्या या राजीनामापत्रावर अद्याप तरी निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे पुढे आता नेमके काय होणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content