Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खामगावचे गोपाल शर्मा सांभाळत आहेत आईएसपीएल टि-१० क्रिकेट लिगच्या मॅनेजमेंटची जबाबदारी

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  बुलढाणा जिल्ह्यातील रजत नगरी खामगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रीय पातळीवरील आयएसपीएल टि-१० क्रिकेट लिगच्या मॅनेजमेंटची जबाबदारी खामगावचे सुपुत्र गोभाल तेजमल शर्मा हे लिल्या सांभाळत आहेत. शर्मा हे या स्पर्धेत क्रिकेट ऑपरेशन मैनेजर म्हणून काम करीत आहेत.
नुकतेच ६ मार्च रोजी आयएसपीएल टि-१० क्रिकेट लिगला प्रारंभ झाला आहे.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या क्रिकेट टिमची मालकी वेगवेगळ्या सिने सुपरस्टारने घेतलेली आहे, यामध्ये अमिताभ बच्चन, अक्षयकुमार, रितीक रोशन, मुर्गा, राम चरण, सैफ अली खान व करीना कपुर यांच्या टिम सहभागी झालेल्या आहेत, या क्रिकेट स्पर्धेचे थेट प्रसारण सोनी टेन-२ वर करण्यात येत आहे. या स्पर्धेकरीता खामगावचे सुपुत्र गोमाल शर्मा यांची क्रिकेट ऑपरेशन मॅनेजर म्हणून नेमणूक झालेली असून शर्मा हे क्रिकेट सामन्यांच्या मॅनेजमेंटची मोठी जचाचदारी सांभाळत आहे. गोपाल शर्मा हे गेल्या १५ वर्षापासून क्रिकेट प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या अगोदर त्यांनी आयपीएलमधील संघासाठी काम केलेले आहे. त्याचप्रमाणे फुटबॉल स्पर्धेतही त्यांनी मोठ्या संघासोचत काम केलेले आहे. मुंचई टि- १० लिगमध्येही त्यांनी काम केलेले आहे. गोपाल शर्मा हे  तलाव रोड भागातील रहिवाशी असून ते बंदेमातरम् क्रिकेट टिमचे खेळाडू होते. त्यांची राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट लिगकरीता महत्वाच्या पदावर नेमणूक होणे ही खामगावकरांसाठी भुषणावह बाब आहे.

Exit mobile version