Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुगलने प्ले स्टोर वरून हटवले भारतीय ॲप्स

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गुगलने कित्येक भारतीय अ‍ॅप्सवर मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारपासून हे अ‍ॅप्स आपल्या प्ले-स्टोअरवरुन हटवण्यास गुगलने सुरूवात केली आहे. यामध्ये भारत मॅट्रिमॉनी, शादी डॉट कॉम, कुकू एफएम, अल्ट बालाजी अशा प्रसिद्ध अ‍ॅप्सचा देखील समावेश आहे. सर्व्हिस फी न दिल्यामुळे ही कारवाई केली जात असल्याचं गुगलकडून सांगण्यात आलं.

गुगलने कारवाई केलेल्या अ‍ॅप्समध्ये Bharat Matrimony, Matrimony.com, Shaadi.com, Jeevansathi या मॅट्रिमॉनियल अ‍ॅप्सचा समावेश आहे. सोबतच ALTT (अल्ट बालाजी) हे ओटीटी अ‍ॅप, Kuku FM हे ऑडिओ अ‍ॅप आणि Quack Quack, Truly Madly या डेटिंग अ‍ॅप्सचा समावेश आहे. यासोबतच, Info Edge कंपनीचे Naukri.com, Naukri Recruiter, 99acres, Shiksha हे अ‍ॅप्स देखील डीलिस्ट करण्यात आलेले आहेत.

गुगलच्या या कारवाईवर भारतीय अ‍ॅप्सनी नाराजी व्यक्त केली आहे. गुगलने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक अ‍ॅप्स हटवण्यास सुरुवात केली असल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे. भारत मॅट्रिमॉनीचे फाऊंडर मुरुगावेल जानकीरामन यांनी हा दिवस भारतातील इंटरनेटसाठी काळा दिवस असल्याचं म्हटलं.

कुकू एफएमचे को-फाऊंडर विनोद कुमार मीना म्हणाले, की गुगल एका मोनोपॉलीप्रमाणे काम करत आहे. ‘जीवनसाथी’च्या इन्फो एज कंपनीचे संस्थापक संजीव बिकाचंदानी म्हणाले, की त्यांनी वेळेवर गुगलला सगळी फी भरली असूनही ही कारवाई करण्यात आली. तर, क्वॅकक्वॅक अ‍ॅपचे फाऊंडर रवी मित्तल यांनी सांगितलं, की कंपनी गुगलने दिलेल्या नियमांचे पालन करेल.

Exit mobile version