Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एसीबीकडून गुडन्युज; सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना पूर्णपणे क्लीन चीट

Ajit Pawar 500 2

नागपूर वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळाला आहे. कारण अजित पवार यांचा थेट संबंध सिंचन घोटाळ्याशी जोडता येणार नाही, असे अँटी करप्शन ब्युरोने (एसीबी) हायकोर्टात म्हटले आहे. एसीबीचे महासंचालक परमबीर सिंग यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्रक सादर केले आहे. यामध्ये विदर्भातील विविध सिंचन प्रकल्पांतील सर्वच प्रकरणांत अजित पवार यांना पुर्णपणे क्लीनचिट देण्यात आली आहे.

सिंचन घोटाळ्या प्रकरणी सिंचन विभागाशी संबंधित २६५४ निविदांची चौकशी सुरू आहे. यांपैकी तब्बल ४५ प्रकल्प विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे आहेत. पैकी २१२ निविदा प्रकरणांची चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. या २१२ पैकी २४ प्रकरणांची नोंदणी करण्यात आली आहे. या २४ प्रकरणांपैकी ५ प्रकरणावंर आरोपपत्र दाखल करण्याचे काम पूर्ण झाले आहे. यांपैकी पुरावे नसल्याने ४५ निविदांची चौकशी बंद करण्यात आली आहे. यां पैकी एकूण ९ केसेस बंद करण्यात आली आहेत आण यातील कोणत्याही प्रकरणांशी अजित पवार यांचा काही संबंध नसल्याचे एसीबीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मात्र, आणखी काही माहिती समोर आल्यास, तसेच जर न्यायालयाने त्याबाबत काही आदेश दिल्यास या प्रकरणाची पुन्हा चौकशी केली जाऊ शकते असे एसीबीने म्हटले आहे. त्यामुळे न्यायालया आता काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version