Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुड शेफर्ड विद्यालयात पारितोषीक वितरण

धरणगाव प्रतिनिधी । येथील गुड शेफर्ड इंग्रजी माध्यम विद्यालयात वार्षिक पारितोषीक वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.अरुण शिंदे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.कांचन महाजन,डॉ.संदीप सराफ,शाळेच्या प्राचार्या वैशाली पवार,शाखा व्यवस्थापक जगन गावित आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्याहस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करण्यात आले.इयत्ता आठवी व नववी च्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले त्यांना भारती तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच उपशिक्षिका स्वाती भावे यांनी इतनी शक्ती हमे देना दाता..हे गीत सादर केले. प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय उपशिक्षक लक्ष्मण पाटील यांनी केला. शाळेचा वार्षिक अहवाल शाळेच्या प्राचार्या वैशाली पवार यांनी सादर केला.नर्सरी,ज्युनिअर केजी व सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकून घेतली.यानंतर मान्यवरांच्या हस्ते नर्सरी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.विशेष प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी,क्रीडा स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम,विविध शालेय स्पर्धा यामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. रावसाहेब पाटील व डॉ.कांचन महाजन यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

ड्रोन,रोबोटिक्स आणि टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून आजच्या पारंपरिक शिक्षण प्रक्रियेला फाटा देत आधुनिक जगाशी स्पर्धा करण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी सज्ज होण्याची गरज आहे,असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डी.आर.टी.फ्लाय प्रायव्हेट लिमिटेड चे मॅनेजिंग डायरेक्टर रावसाहेब पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.अरुण शिंदे यांनी शाळेच्या कार्यक्रमाचे व सर्व शिक्षक वर्गाचे तोंडभरून कौतुक केले तसेच सुनियोजित कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अभिनंदनही केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजनिन शेख,प्रियंका मोराणकर,चैताली रावतोळे,नाजुका भदाणे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेच्या प्राचार्या वैशाली पवार व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच जेष्ठ शिक्षक संतोष सूर्यवंशी,रिबेका फिलिप,भारती तिवारी,चैताली रावतोळे,रमिला गावित,स्वाती भावे,पूनम बाचपाई,ग्रीष्मा पाटील,गायत्री सोनवणे,पूनम कासार,शिरीन खाटीक,नाजूका भदाणे,सपना पाटील,प्रियंका मोराणकर,अनुराधा भावे,नाजनिन शेख,लक्ष्मण पाटील,अमोल श्रीमावळे(सोनार),विकास भोई,समाधान पाटील,सरला ताई,शितल ताई,माळी दादा,अमोल देशमुख आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version