आनंदाची बातमी – यंदा वेळे अगोदरच पावसाच्या आगमनाचे संकेत !

मुंबई- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज | ज्या पावसाची बळी राज्यासह सर्वजण आतुरतेने वात पाहत आहे. तो पाऊस यंदा वेळे अगोदरच दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सून वेळेआधीच येण्याचा अंदाज वर्तवला आहे. दरवर्षी २२ मेपर्यंत अंदमानमध्ये दाखल होणारा मान्सून यंदा दि.१३ ते १९ दरम्यान म्हणजेच वेळेआधी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यानंतर दि.२० ते २६ मेपर्यंत पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून  तळकोकणात दि.२७ मे ते २ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

दि.३ ते ९ जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

Protected Content