Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खुशखबर : भुसावळ पर्यंत धावणार मुंबई सेंट्रल-दोंडाईचा एक्सप्रेस !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मुंबई सेंट्रल ते दोंडाईचा एक्सप्रेस आता भुसावळपर्यंत धावणार असून याचा प्रवाशांना लाभ होणार आहे.

पश्‍चीम रेल्वे मार्गावरून मुंबई सेंट्रल ते दोंडाईचा एक्सप्रेस ( क्रमांक : ०९०५१/५२) धावत असते. आपल्या परिसरातील नागरिक हे मोठ्या प्रमाणात सुरतसह गुजरातमध्ये वास्तव्यास असून त्यांना प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी ही ट्रेन पाळधी वा जळगावपर्यंत तरी पुढे यावी अशी मागणी कधीपासूनच करण्यात येत होती. प्रवासी संघटना, झेडआरयूसीसी सदस्य आदींनी देखील याची मागणी केली होती.

या अनुषंगाने खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री,रेल्वे बोर्ड यांच्याशी सतत पत्रव्यवहार व वार्तालाप केला होता. या पाठपुराव्याला आता यश आले असून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई सेंट्रल दोंडाईचा एक्सप्रेस भुसावळ पर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले आहे.नविन हंगामी प्रवाशी रेल्वे दि.९ जानेवारी पासुन ३१ मार्च पावेतो प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत असुन सदर गाडी रविवार ,मंगळवार व शुक्रवार रोजी रात्री ११.५५ मिनीटांनी मुंबई सेंट्रल येथुन सुटेल प्रवासादरम्यान बोरीवली भोईसर वापी बलसाड नवसारी चलथान बेस्तान बिने बारडोली व्यारा नवापुर नंदुरबार इ ठिकाणी थांबुनअमळनेर १०.४७ मि.धरणगांव ११.१० मि.पाळधी ११.५५ मि.जळगाव व दुपारी १२ वा.भुसावळ येथे पोहोचेल. दोडांईचाहुन सोमवार बुधवार व शनीवारी सायं ५.४० मि.भुसावळ येथुन सुटेल ६.२५ मि.जळगांव ६.४५ पाळधी ६.५८ मि.धरणगांव ७.१८ मि.अमळनेर ७.४४ मि. येथुन सुटेल.

त्यामुळे संपूर्ण खान्देशातील प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे. याबाबतची माहिती खासदार उन्मेषदादा पाटील यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे.

Exit mobile version