खुशखबर : लवकरच सुरू होणार जंबो शिक्षक भरती !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यात लवकरच दोन टप्प्यांमध्ये सुमारे ५० हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

एबीपी-माझा या वाहिनीशी बोलतांना दीपक केसरकर म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षक भरती करण्याचा आमचा विचार आहे. पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसर्‍या टप्प्यात जवळपास २० हजार शिक्षकांची भरती केली जाईल. शंभर टक्के शिक्षक भरती होणार आहे. त्यासाठी संच मान्यता झाली पाहिजे. कारण आरक्षणानुसार ही पद भरती होईल. या उमेदवारांच्या मुलाखती होऊन त्यांची भरती केली जाईल.

दरम्यान, आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर शिक्षक भरतीचा आकडा कळणार असल्याची माहिती देखील केसरकर यांनी दिली आहे. तर शिक्षकांच्या बदल्याबाबत आपण ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचेही ते म्हणाले.

Protected Content