Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सोने तस्करी करणाऱ्या हवाई सुंदरीस मुंबईत अटक

gold cube

मुंबई, वृत्तसंस्था | अंतर्वस्त्रातून सोने तस्करी करणाऱ्या हवाई सुंदरीला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे. ती दुबईतून मुंबईत आली होती. तिच्या अंतर्वस्त्रात चार किलो सोने होते, त्याची किंमत अंदाजे एक कोटी रुपये आहे.

 

आरोपी हवाई सुंदरीजवळ बॅग होती, त्यात ठेवलेल्या अंतर्वस्त्रात चार किलो सोने लपवले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईहून एक खासगी विमान शनिवारी मुंबई विमानतळावर उतरले होते. त्यात असलेल्या हवाई सुंदरीने बॅगमध्ये सोने लपवले होते. ही तस्कर असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला तेव्हा तिला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली. तिच्याजवळील बॅगेची झाडाझडती घेतली. त्याचवेळी बॅगमध्ये ठेवलेल्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवलेले सोने आढळून आले. तिला लगेच अटक करण्यात आली. चार किलो सोने जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत अंदाजे एक कोटी रुपये आहे.

अधिकाऱ्यांनी विमानतळावर संशयावरून ताब्यात घेतलेल्या हवाई सुंदरीकडे चौकशी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली. दुबईतील एका व्यक्तीने तिला सोने तस्करीसाठी ६० हजार रुपये देण्यात येतील असे सांगितले होते. चौकशीदरम्यान तिने ही माहिती अधिकाऱ्यांना दिली.

रेल्वेतूनही सोने तस्करी : दुसरीकडे मुंबई विमानतळावरील कार्गो टर्निमनवरून डीआरआयनं कारवाई करून जवळपास ३० किलो सोने आणि ६० किलो चांदी जप्त केली आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विमानतळावरील कार्गो टर्मिनलस्थित एका कंपनीच्या कार्यालयातून सोने आणि चांदी हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, सोने तस्करीत या कंपनीतील एखादा अधिकारी तर सामील नाही ना, याचा तपास केला जात आहे.

Exit mobile version