Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आंतर शालेय हॉकी स्पर्धेत गोदावरी स्कूलला दुहेरी मुकूट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे बुधवारी आंतर शालेय हॉकी स्पर्धेत १४ वर्षीय गटात गोदावरी इंग्लिश मिडीयमच्या मुले व मुलींचा संघाने विजय मिळवत दुहेरी मुकूट पटकावला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महानगरपालिका स्तरीय आंतर शालेय हॉकी स्पर्धा या प्रताप नगरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात घेण्यात आले. यात  १४ वर्षीय मुलांच्या गटात गोदावरी इंग्लिश मीडियमने  अँग्लो उर्दू स्कूलच्या संघावर मात करत विजय मिळाविला आहे. तर मुलींच्या संघाने सुद्धा गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल ने पोतदार इंग्लिश मीडियम स्कूलचा पराभव करीत सुवर्णपदक मिळवत गोदावरीने दुहेरी मुकुट संपादन केले.

जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत अंतिम सामना बियाणी मिलिटरी स्कूल विरुद्ध एमआय तेली यांच्या खेळला गेला त्यात एमआय तेली संघाने बियानीं संघाचा पराभव करत मुलांच्या गटात सुवर्णपदक तर मुलींच्या गटात सेंट मेरी स्कूल, अमळनेर  यांनी स्वर्ण पदक पटकाविले.

 

स्पर्धेतील विजयी व उप विजयी संघांना हॉकी जळगाव व स्पोर्ट्स हाऊसतर्फे पदके देण्यात आली. याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आयशा खान, नगरसेवक रियाज बागवान, हॉकी जळगावचे सचिव फारूक शेख, स्पोर्ट्स हाऊस चे संचालक आमीर शेख, क्रीडा मार्गदर्शक मीनल थोरात, क्रीडा संचालक आसिफ शेख, मुस्लिम सेवा संघ चे सलीम रणवावाले, हमीदा बानो, क्रीडा शिक्षक राहील अहमद,राष्ट्रीय खेळाडू अरबाज खान आदी उपस्थित होते.

Exit mobile version