Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाचे मन्यारखेडा तलावावर स्वच्छता मोहीम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाच्या वतीने नुकतेच मन्यारखेडा तलाव परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला होता.

गोदावरी फाउंडेशन संचलित इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी एक जबाबदार नागरीक व आपल्या सभोवतालचा परिसर हा स्वच्छ असला पाहिजे त्यामुळे रोगराई तसेच प्रदूषण कमी होते या उद्देशाने व स्वच्छता पखवाडा अंतर्गत येणारा व शासनाच्या निर्देशाने स्वच्छता ही सेवा ही मोहीम मन्यारखेडा परिसरामध्ये असलेल्या तलावाजवळ राबविली. गणपती विसर्जनानंतर तलावाजवळ असलेले निर्माल्य, प्लास्टिक व इतर कचऱ्याचे विद्यार्थ्यानी संकलन केले. या मोहिमेमध्ये महाविद्यालयाच्या सुमारे100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला.

महाविद्यालयाचे संचालक डॉ.प्रशांत वारके व नॅक समन्वयक डॉ. नीलिमा वारके यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version