Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयास नॅक मानांकन

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । नर्सिंग क्षेत्रातील शिक्षण व करिअर साठी विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ रित्या मार्गदर्शन करणाऱ्या गोदावरी नर्सिंग महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन परिषद ( नॅक) ने शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये (बी प्लस) मानांकन दिले आहे. ही बाब महाविद्यालयाच्या प्रगतीत गौरवास्पद आहे.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालय हे पहिल्यादांच नॅक च्या पहिल्या सायकल मध्ये गेले असून बी प्लस श्रेणी मिळवून यशस्वी ठरले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व गुणवत्तापूर्ण शिक्षण सामाजिक दृष्ट्या संवेदनशील असावे हे संस्थेचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांचे ध्येय आहे. गोदावरी नर्सिंग महाविद्यालय हे सन २००३ पासून सुरू झाले असून आज पर्यंत अनेक विद्यार्थी परदेशात, तसेच शासकीय, निम शासकीय नोकरी , प्रशासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत आहेत.

संस्थेच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील, श्री सुभाष पाटील, डॉ.वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, प्राचार्य,  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी ,पालक माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

Exit mobile version