Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गो.से. हायस्कूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या गो. से. हायस्कूल मध्ये मार्च -२२ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेतील प्रथम पाच क्रमांक पटकावणाऱ्या तसेच स्कॉलरशिप परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि गुणवंत शिक्षकांचा सत्कार सोहळा संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला.

यावेळी शाळेतून प्रथम पाच क्रमांक पटकावणारे विद्यार्थी सिद्धम धीरज विसपुते, श्रुती प्रवीण शिंपी, श्रावणी सतीश सोमवंशी, हर्षदा बाळकृष्‍ण धुमाळ, शितल बाळू बोरुडे यांचे सह शिष्यवृत्ती पाचवीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करणारे खुषी सोनवणे, हर्षल चौधरी आणि आठवी शिष्यवृत्तीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेले वैष्णवी पाटील, श्रद्धा शेंडे, कुणाल पाटील, विश्वजीत पाटील, पुष्कर मांडगे यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याशिवाय “व्ही स्कूल” ॲपच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रमात विशेष कार्य केल्याबद्दल शाळेतील शिक्षक आर. बी. बांठिया आणि डी. डी. विसपुते यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना संस्थेच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेत भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम विद्यार्थी संस्थेत निर्माण होत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले संस्थेचे व्हाईस चेअरमन विलास जोशी आणि तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांनी देखील विद्यार्थ्यांना मनोगतातून शुभेच्छा दिल्या. सत्कारास उत्तर देताना सिद्धम विसपुते याने शाळेबद्दल ऋण व्यक्त केले तर पालकांतर्फे मार्केट कमिटीचे सचिव बी. बी.‌ बोरुडे,आणि सतिष सोमवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी केले. तर आभार प्रदर्शन आर. बी. बोरसे यांनी केले.

यावेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक एन. आर. पाटील, आर. एल. पाटील, ए. बी.अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी, कार्यालयीन अधीक्षक अजय सिनकर यांचे सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version