घरगुती गणेश आरास स्पर्धेच्या विजेत्यांना घरोघरी जाऊन बक्षीस वितरित

 

शेंदूर्णी, प्रतिनिधी। येथील मूळ रहिवासी व विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोराचे संचालक डॉ. सागर गरुड यांच्या संयोजनाने जामनेर तालुक्यातील सर्व गणेश भक्तांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या विजेत्यांना त्यांच्या गावात जाऊन बक्षीस वितरित अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. सागर गरुड यांनी गणेशत्सव काळात गणेश भक्तांसाठी व्हाट्सअपच्या माध्यमातून भाविकांच्या घरातील लाडक्या बाप्पाचे आरसाचे किंवा डेकोरेशनचे फोटोंची स्पर्धा आयोजित केली होती. यास्पर्धेस तालुक्यातील भाविकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून यात विजेत्या स्पर्धकांना त्यांच्या गावी जाऊन बक्षीस वितरण करण्यात आले.

यात कुऱ्हाड, नाईकनगर, म्हसास, लोहारा, कळमसर, नांद्रा, भराड़ी, नेरी, माळपिंप्री, टाकरखेड़ा,जामनेर, शेंदूर्णी, सांगवी, सुंनसगाव, नेरीदिगर,पहुर, पाठखेड़ा, चिंचखेड़ा, पाळधी या गांवामध्ये जाउन विजयी २० स्पर्धकांना त्यांच्या गावांत त्यांच्या घरी डॉ.सागर गरुड़ मित्रपरिवारातर्फे बक्षीस वितरित करण्यात आले.याप्रसंगी डॉ.सागर गरुड़ यांचा गावोगावीं मोठ्या प्रमाणात असलेला मित्र परिवार उपस्थित होता.

Protected Content