Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेरात भव्य जीएम हॉस्पीटलच्या उभारणीला वेग

g m hospital pahani

जामनेर प्रतिनिधी । शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जीएम हॉस्पिटल उभारण्यात येत असून याच्या कामाला वेग आल्याचे दिसून येत आहे.

जामनेर पालीकेजवळील राजमाता जिजाऊ चौकातील बिओटी व्यापारी संकुलाच्या दुसर्‍या मजल्यावर या हॉस्पिटलचे काम सुरू झाले आहे. या कामाची पाहणीणी राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण तथा जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच केली. यामधे रुग्णांसाठी शंभर खाटांचा समावेश करण्यात येऊन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सुवीधा परीसरातील सर्व-सामान्यांना मिळणार आहेत. ना. गिरीश महाजनांतर्फे अरोग्यदूतांच्या माध्यमातून दिल्या जाणार्‍या सुविधेचा हजारो रूग्णांना लाभ झाला आहे. त्याच धर्तीवर या हॉस्पिटलमधे आता रूग्णांना सेवा मिळणार असल्याची माहितीही यावेळी हॉस्पिटल सुत्रांकडुन देण्यात आली. यात मुंबईतील विवीध प्रकारांच्या आजारावरचे तज्ज्ञ डॉक्टर यांची पूर्णवेळ सेवा येथे मिळणार असुन यात दहा कोटीच्या वर किंमतीच्या अद्ययावत यांत्रीक सुवीधांचा समावेश असेल. यासोबतच नर्सिंगची सुवीधाही हॉस्पिटलच्या परीसरात सुरु होणार आहे. दरम्यान, जि एम हॉस्पिटल बांधकामाची पहाणी करतांना पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्यासोबत शिक्षण संस्थेचे सचिव जितू पाटील,श्री-श्री इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक श्रीकांत खटोड, अभियंता दिपक पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version