चोरट्यांचा प्रताप – दोन मालवाहू गाडीतून लांबविली बॅटरी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भोईटे नगरातील यश लॉन्स जवळील दोन मालवाहू गाडीतून बॅटरी लांबविल्याची घटना शनिवार, दि. ३० एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, ‘शहरातील सम्राट कॉलनीतील सुनिल मानिकलाल श्रीश्रीमाळ यांचे यश लॉन्स परिसरात मंडप डोकेरेशनचे दुकान आहे. याठिकाणी त्यांनी (एमएच १९ एस ८५०८) क्रमांकाची मालवाहू छोटा हत्ती व (एमएच १९ एस ०९१२) क्रमांकाचे आयशर वाहने उभे केली होती.

दि.२८ ते ३० एप्रिल रोजी दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या वाहनातील बॅटरी लंपास केली. दि.३० रोजी सकाळी ८ वाजता सुनिल यांचे मोठे भाऊ प्रदिप श्रीश्रीमाळ हे दुकानावर गेले असता, त्यांना दोघं वाहनातील बॅटरी दिसून न आल्याने त्यांना बॅटरी चोरी झाल्याची खात्री झाली.

याप्रकरणी त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार ८ हजार रुपये किंमतीच्या बॅटरी चोरी प्रकरणी अज्ञात चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content