Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रमजान ईदसाठी बाजारात विशेष सूट द्या; मुस्लिम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टचे निवेदन

जळगाव प्रतिनिधी । रमजान ईद दोन दिवसावर आला असून कोरोना लॉकडाऊन असल्यामुळे मुस्लिम बांधव गेल्या दोन वर्षांपासून रमजान ईद साजरी करून शकत नाही. त्यामुळे रमजान ईदसाठी वस्तू खरेदीसाठी बाजारात विशेष सुट द्यावी, अशी मागणी जिल्हा मुस्लिम इदगाह व कब्रस्तान ट्रस्टच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देवून केली आहे.

जिल्हा मुस्लिम इदगाह व कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक व जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांचा प्रमुख उपस्थिती होती. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ११ ते १४ मे २०२१ या तीन दिवसासाठी बाजाराच्या वेळेत विशेष सवलत देऊन त्यात प्रामुख्याने लहान मुलांचे रेडिमेट कपडे, त्यांना लागणारी खेळणी व इतर साहित्य तसेच शीर-खुर्मासाठी लागणारे वेगवेगळे ड्रायफ्रुट्स, फितरासाठी धान्य व उपास सोडण्यासाठी आवश्यक ते फळे व भाजीपाला यांची दुकाने दुपारी १० ते १२ किंवा संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत विशेष बाब म्हणून उघडण्याची परवानगी द्यावी. जिल्हा दंडाधिकारी लातूर यांनी ज्याप्रमाणे आदेश पारित केले त्याच धर्तीवर शासनाच्या नियमावलीच्या अधीन राहून काही कडक नियम शितील करू परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सकारात्मक धोरण अवलंबून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

Exit mobile version