Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्या; संघटनेची मागणी

यावल प्रतिनिधी । कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा तसेच भेदभाव दूर करून समान काम समान वेतन प्रमाणे सरसकट १५ हजार रूपये वेतन यासह विविध मागण्यांचे निवेदन तालुका कोतवाल संघटनेतर्फे तहसीलदार यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, भेदभाव दूर करून समान काम समान वेतन प्रमाणे सरसकट पंधरा हजार रुपये वेतन द्या, तलाठी महसूल सहाय्यक व तत्सम पदासाठी ५० टक्के आरक्षण देण्यात यावे, शिपाई पदाच्या सर्व रिक्त जागा कोतवाल मधूनच भरण्यात यावा, मयत झालेल्या कोतवालांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर सेवेत समावून घ्यावे, सेवानिवृत्त झाल्यानंतर कोतवालास १० लाख रुपये रक्कम निर्वाहभत्ता व राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली असून १५ ऑगस्ट२०२१ पर्यंत मागण्या मंजूर न झाल्यास राज्यभरात कोतवाल संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अशा आशयाचे निवेदन तहसीलदार महेश पवार यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर कोतवाल संघटनेचे यावल तालुकाध्यक्ष धनराज महाजन, उपाध्यक्ष प्रशांत सरोदे, सचिव सुमन आंबेकर, सदस्य ओंकार सपकाळे, तुषार जाधव, पंढरी अडकमोल, आयुब तडवी, निलेश गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

Exit mobile version