Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोंडगाव प्रकरणातील आरोपीस फाशीची शिक्षा द्या; पाचोऱ्यात कडकडीत बंद

पाचोरा येथे सर्व पक्षीय व विविध सामाजिक संघटनांचा भव्य मुक मोर्चा

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील आठ वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर येथील नराधमाने अतिप्रसंग करुन तिला जीवे ठार मारले त्या नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी. यासाठी सदरचा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा या मागणीसाठी पाचोरा येथे संपर्क शहरातील किराणा दुकाने, मेडिकल, दवाखाने, जनरल स्टोअर्स, हॉटेल, पानटपऱ्या, कापड दुकाने, भाजीपाला विक्री, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालयात, इंग्रजी माध्यमाच्या शाळांसह सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले आहेत.

तालुक्यातील व शहरातील शिवसेनेचे दोन्ही गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय कॉंग्रेस, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड,एकता अॅटो रिक्षा युनियन, मेडिकल असोसिएशन, डॉक्टर्स असोसिएशन, समता सैनिक दल, समता परिषद, माजी सैनिक संघटना, ग्राहक मंच, महापूरुष सन्मान समिती सहविविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मुखमोर्चात सामिल झाले आहे. यावेळी पाचोरा महाविद्यालयातील युवतीही मुकमोर्चात सामिल झाल्या होत्या. कृष्णापूरी भागापासून, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेल्वे स्टेशन रोड, देशमुख वाडी, गांधी चौक ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य मोर्चा आणून मोर्चाची सांगता करण्यात आली.

मुक मोर्चात आमदार किशोर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय वाघ, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, जिल्हा प्रमुख दिपकसिंग राजपूत, उपजिल्हा प्रमुख उद्धव मराठे, तालुका प्रमुख शरद पाटील, रमेश बाफना, शहर प्रमुख अनिल सावंत, तिलोत्तमा मौर्य, शिंदे गटाचे तालुका शहर प्रमुख किशोर बारवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, सतीष चौधरी, रणजित पाटील, भुषण वाघ, सुचेता वाघ, सरला पाटील, ज्योती वाघ, अभिलाषा रोकडे, सुनिता मांडोळे, महापुरुष सन्मान समितीने कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे जिल्हा प्रचारक किशोर डोंगरे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनिल पाटील, एस. के. पाटील, डाॅक्टर्स असोशिएनचे अध्यक्ष डॉ. दिनेश सोनार, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. पवनसिंग पाटील, डॉ. प्रविण माळी, डॉ. भरत पाटील, डॉ. अजयसिंग परदेशी, डॉ. नंदू पिंगळे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरीभाऊ पाटील, प्रविण ब्राम्हणे, एकता अॅटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष एकनाथ सदनशिव, सचिव अनिल लोंढे, सुधाकर महाजन, प्रविण माने, नाना देवरे, वासुदेव महाजन, चिंधू मोकळ, प्रा. वासुदेव वले, प्रा. राजेश मांडोळे, प्रा. कमलाकर इंगळे, समाज सेविका ललिता पाटील, वैशाली बोरकर, मनिषा पवार, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल मुक मोर्चात सहभागी झाले होते. यासह मुक मोर्चास समता सैनिक दल, मराठा सेवा संघ, अखिल मराठा सेवा प्रतिष्ठान, वंचित बहुजन आघाडी,  विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

 

Exit mobile version