Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामुल्य करणार ;शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध

uddhav 2

मुंबई (वृत्तसंस्था) सत्तेत आल्यावर १० रूपयांमध्ये अन्न देण्याचा घेतलेल्या निर्णयात आम्ही बचतगटांची मदत घेणार आहोत. तिजोरीवर कितीवर भार पडेल हा विचार करून आम्ही जेवण १० रूपयांनी देण्याचा निर्णय घेतला आहे. समतोल ढळणार नाही याचा विचार करून वचननामा तयार केला आहे. यातले एकही मत खोटे ठरणारे नाही, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

 

शिवसेनेच्या वचननाम्यात आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामुल्य करणार. राज्यातील १५ लाख पदवीधर युवांना शिष्यवृत्तीची संधी देणार. तालुका स्तरावर गाव ते शाळा / महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी २,५०० विशेष बसची सेवा सुरू करणार. शेतीखालील क्षेत्रवाढीसाठी अल्पभूधारक व आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रु. १०,००० प्रतीवर्षी जमा करणार. ३०० युनिट पर्यंत वीजवापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीज दर ३० टक्क्यांनी कमी करणार. राज्यातील सर्व खेड्यांतील रस्ते बारमाही टिकाऊ करण्याचे धोरण आखणार. १ रुपयात आरोग्य चाचणी सुविधा देण्यासाठी राज्यभरात ‘१ रुपी क्लिनिक’ सुरु करणार. निराधार पेन्शन योजने अंतर्गत असणारे मानधन दुप्पट करणार. १० रुपयांत सकस जेवणाची थाळी, राज्यातील सर्व गावांमधील पारंपारिक धार्मिक स्थळांचे सामाजिक महत्व लक्षात घेऊन दुरूस्ती व देखभालीसाठी अनुदान देणार,अशा गोष्टींचा समावेश आहे. सर्वांच्या मागण्यांचा आणि सर्व बाबींचा विचार करून हा वचननामा तयार करण्यात आला आहे. हा वचननामा तयार करताना महिला वर्गांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये बारकोडही देण्यात आला आहे,” असं मत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

 

Exit mobile version