Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बिहारमध्ये सामुहिक बलात्कारानंतर मुलीला पेटवले

Rape2 678x381

बक्सर (वृत्तसंस्था) बक्सर जिल्ह्यात एका मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. या घटनेने हैदराबाद प्रमाणे बिहारमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पिडीत तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयानी दिली होती. पीडित मुलगी घराच्या बाहेर उभी असताना दोन तीन अज्ञात लोक तिच्यासोबत काही तरी बोलत होते. कुटुंबीयानी हे पाहिले परंतु, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परंतु, काही वेळानंतर मुलगी व तिच्यासोबत अज्ञात व्यक्ती न दिसल्याने त्यांनी मुलीची शोधाशोध सुरू केली. कुटुंबियांनी पोलीसात तक्रार नोंदवली. याच दरम्यान, एका अज्ञात नंबरवरून फोन आला. मुलगी आता घरी येणार नाही, असे सांगून फोन कट केला. त्यानंतर मंगळवारी सकाळी कुकुढा गावाच्या जवळ मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन केल्यानंतर मुलीसोबत सामूहिक बलात्कार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच तिची गोळी झाडून हत्या करत तिला पेटवून दिल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली.

Exit mobile version