Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सत्तारांवर कारवाई करून सरकारने धर्मनिष्ठा दाखवावी : आ. महाजनांचे आव्हान

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भगवान हनुमान यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणारे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावरून माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी हनुमानाबाबत अवमानकारक वक्तव्य असणारी व्हिडीओ क्लीप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. यावरूनच आता माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. नाशिक येथे पत्रकारांशी बोलतांना याबाबतच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना आमदार महाजन यांनी सरकारने अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करून आपली धर्मनिष्ठा दाखवून द्यावी असे खुले आव्हान दिले आहे.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत आमदार गिरीश महाजन यांनी नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अवघे सहाच नगरसेवक महापालिकेत असल्याने इतके दिवस भुजबळांना कधी महापालिकेत जाता आले नाही. परंतु, आता प्रशासक राजवट लागू झाल्याने भुजबळ महापालिकेत जाऊन अधिकार्‍यांच्या भेटी घेत आहेत. अडीच वर्षे महाविकास आघाडीची राज्यात सत्ता असल्याने भुजबळांनी नाशिकसाठी किती निधी मिळवून दिला, याचे उत्तर भुजबळांनी द्यावे, असे आव्हान आ. गिरीश महाजनांनी भुजबळांना दिले. दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवटीबाबत राज्यपाल निर्णय घेतील. गृहमंत्र्यांनी भोंगे प्रकरणी बोलविलेल्या बैठकीचे मुख्यमंत्र्यांना गांभीर्य नसल्याची टीका देखील आमदार गिरीश महाजन यांनी केली.

Exit mobile version