आ. गिरीश महाजन यांची प्रचार केलेल्या जागेवर भाजपचा विजय

जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी पश्‍चीम बंगालमध्ये प्रचार केलेले बालूरघाट मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. अशोक लाहिरी यांचा विजय झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, माजी मंत्री आमदार गिरीश महाजन हे सुमारे २० दिवस पश्‍चीम बंगालमध्ये प्रचारासाठी गेले होते. यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका रॅलीत देखील प्रचार केला होता. त्यांच्याकडे बालूरघाट मतदारसंघाची जबाबदारी टाकण्यात आली होती. येथून भाजपतर्फे डॉ. अशोक लाहिरी यांना उमेदवारी देण्यात आली होती. लाहिरी हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ असून ते पंधराव्या वित्त आयोगाचे सदस्य देखील आहेत. शासकीय आणि खासगी क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठेची पदे भूषविणार्‍या डॉ. लाहिरी यांना भाजपने बालूरघाट मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. त्यांच्या प्रचाराची धुरा आमदार गिरीश महाजन यांच्यावर सोपविण्यात आली होती.

बालूरघाट मतदारसंघात २०११ साली तृणमूलचा तर २०१६ साली आरएसपी पक्षाचा उमेदवार निवडून आला होता. यंदा मात्र भाजपने ही जागा आपल्याकडे खेचून आणली असून डॉ. अशोक लाहिरी यांनी साडे तेरा हजार मतांनी तृणमुलच्या उमेदवाराला धुळ चारली आहे. त्यांच्या प्रचाराचे नियोजन आमदार गिरीश महाजन यांनी केले होते. पश्‍चीम बंगालमध्ये तृणमुलच्या झंझावातासमोर मिळवलेला हा विजय लक्षणीय मानला जात आहे. यासोबत गंगारामपूर येथून सत्येंद्रनाथ राय आणि तपण येथून बुधुराय तुडू या उमेदवारांचा प्रचार देखील आमदार महाजन यांनी केला होता. हे दोन्ही उमेदवार देखील विजयी झाले आहेत.

आ. गिरीश महाजन यांच्याबाबत प्रचारात अमित शाह काय म्हणाले होते ? पहा खालील व्हिडीओ !

Protected Content