Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घराचे बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक; पती-पत्नी विरोधात गुन्हा

download 10

यावल प्रतिनिधी । घराच्या उताऱ्यावर खासगी फायनान्स कंपनीचा बोजा असतांना घराचे बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक केल्याप्रकरणी यावल पोलीसात पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यावल येथील यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, सध्या पोलीस सेवेतून निलंबीत असलेले पोलीस कर्मचारी अय्युब हसन तडवी व हसीना अय्युब तडवी रा. मोहराळे यांनी येथील गट नं. ६९२ मधील प्लॉट क्र. ४८ (ब) मधील घरावर दिवानंद हौसींग फायनान्स कंपनिचे कर्ज घेवून त्या कर्जाची परतफेड न करता सदरच्या मिळकतीचे बनावट कागदपत्रे तयार करून व्यास नगरातील रहीवाशी योगीराज धनराज तेली १३ लाखात घर विकून तेली यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी योगीराज तेली यांच्या फिर्यादीवरून भादवी कलम ४१८, ४२०, ४६५, ४६८, १२० (ब), ३४ प्रमाणे पती-पत्नी विरूध्द यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि सुजीत ठाकरे करीत आहे.

Exit mobile version