Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लस घ्या आणि वृक्षारोपण करा ! : नीर फाऊंडेशनची अनोखी मोहिम (व्हिडिओ)

जळगाव सचिन गोसावी/संदीप होले । एकीकडे लसीकरणाचे नियोजन कोलमडत असून नागरिकांना त्रास होत असतांनाच आता जैन समूहाने स्वाध्याय भवनात लसीकरण केंद्र सुरू केल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. तर याच केंद्रावर नीर फाऊंडेशनतर्फे लस घेतलेल्या नागरिकांना वृक्षाची रोपे देऊन त्यांचे संवर्धन करण्याचा आग्रह धरला जात आहे.

नीर फाउंडेशनचे अध्यक्ष सागर महाजन यांनी लस घ्या आणि वृक्षारोपण करा या अभिनव उपक्रमाबाबत माहिती देतांना सांगितले की, जागतिक कोरोना महामारीत ऑक्सिजन अभावी कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. भविष्यात ऑक्सिजनच्या कमतरतेने कोणाचे प्राण जावू नये यासाठी झाडे लावणे हा एकमेव पर्याय आपल्या समोर असल्याने आम्ही लसीकरण करून आलेल्यांना रोपे देऊन त्यांच्याकडून आम्ही झाडे जगवू असे संकल्प पत्र भरून घेत आहोत.  आज स्वाध्याय भवनात लसीकरणाचा पहिलाच दिवस असून  ३०० रोपांचे वाटप करण्याचा संकल्प केला असल्याचे श्री. महाजन यांनी स्पष्ट केले. जागतिक स्तरावर प्रदूषण ही एक मोठी समस्या बनली आहे. पर्यावरण संतुलन बिघडत असून वृक्ष रोपण करणे काळाची गरज बनली आहे. वृक्ष रोपणबाबत जनजागृती करण्यासाठी नीर फाउंडेशनने हा अनोखा उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती डॉ. शुभम ठाकूर यांनी दिली. 

 

 

Exit mobile version