Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आईवडिलांना अभिमान वाटेल असे ‘यश’ मिळवा : पोलीस अधीक्षक पाटील

WhatsApp Image 2019 09 29 at 8.20.19 PM

पारोळा, प्रतिनिधी | स्वप्ने जरूर बघवीत मात्र उघड्या डोळ्यांनी आणि स्वप्ने तीच खरी असतात जी झोपू देत नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घ्या अन आई वडिलांना,समाजाला अभिमान वाटेल असे यश मिळवा असे प्रतिपादन अधीक्षक राज्य राखीव पोलीस धुळे संजय पाटील (चौधरी) यांनी केले. तेली भुवन येथे तेली समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा व सेवपूर्ती व्यक्ती सत्कार कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला होते.त्यावेळी अधक्ष्यस्थानावरून ते बोलत होते.

दहावी, बारावी, पदवीधर शिक्षणात व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर माजी उपनगराधक्ष्य रेखा चौधरी, नगरसेवक कैलास चौधरी, नगरसेवक नवल सोनवणे, महेश चौधरी, अशोक चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष वामन चौधरी, अशोक चौधरी, माजी अधक्ष्य अरुण चौधरी, एस. बी. चौधरी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक पाटील पुढे म्हणाले की, सोशल मिडियापासून विद्यार्थ्यांनी दूर राहिले पाहिजे. तारुण्य हे शिक्षणाचे वय आहे. वर्गातला अभ्यासापेक्षा जगाचा अभ्यास अवगत केला पाहिजे. डॉक्टर, इंजिनिअर हेच यथासांग करिअर न निवडता स्वतःची वेगळी वाट निर्माण करून त्यात प्रगती साधली पाहिजे असे सांगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी वेगळी वाट शोधून जगविख्यात शास्रज्ञ झाल्याचे नमूद केले. काहीही बना मात्र नाळ मातीशी जोडून ठेवा. पाय जमिनीवर असू द्यावा. स्पर्धा स्वतःशी करावी. दररोज नवनवीन पुस्तकांचे वाचन करा,चिंतन करा मनन करा,निरीक्षण करा असा मौलिक सल्लाही अधीक्षक पाटील( चौधरी) यांनी उपस्थितांना दिला. गुणवत्ता प्रत्येकात असते फक्त ज्याने जेवढी मेहनत घेतली तेवढे त्याला यश मिळत असते. अभ्यास करतांना टॉपिक समजून घ्या नुसतीच घोकंपट्टी करू नका असा मौलिक सल्ला गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत चौधरी यांनी दिला.शिक्षणातू भविष्य घडते आणि भविष्यातूनच समाज घडत असतो. अंगी जिद्द, चिकाटी आंगीकरून कठोर परिश्रम घेतले पाहिजे. कठोर परिश्रमाशिवाय यश मिळणे अवघड आहे असे मत जिल्हा उपाध्यक्ष वामन चौधरी यांनी व्यक्त केले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, सचिव भरत चौधरी, संजय चौधरी, सुनील चौधरी, नवयुवक मंडळाचे अधक्ष्य गोपाल चौधरी, राहुल चौधरी, गोलू चौधरी, गोपाल चौधरी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन धर्मदास चौधरी तर प्रास्तविक अनिल चौधरी यांनी केले. या सेवपूर्तीचा झाला सत्कार माजी प्राचार्य संजय भिका चौधरी, प्रा. मधुकर आंनदा चौधरी, न. पा. कर्मचारी वासुदेव चौधरी, माजी पीएसआय प्रेमचंद भोजू चौधरी उपस्थित होते.

Exit mobile version