Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गव्हाच्या पाठोपाठ साखर निर्यातीवर बंदी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्र सरकारने गव्हानंतर आता साखरच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामुळे देशातील साखरेचे दर नियंत्रणात राहणार असले तरी साखर कारखान्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

साखरच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आता साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. १ जूनपासून ही बंदी अंमलात येणार असून याला ३० ऑक्टोबरपर्यंत लागू करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील साखरचे दर नियंत्रणात येणार असले तरी कारखान्यांचे अर्थकारण बिघडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

साखर उत्पादनात जगात ब्राझील पहिल्या क्रमांकावर असून हिंदुस्थानचा दुसरा क्रमांक लागतो. यंदा देशात सुमारे चारशे लाख मेट्रिक टन साखर उत्पादन अपेक्षित आहेत. तर देशाची साखरेची वार्षिक गरज २५० लाख मेट्रिक टन एवढी आहे. त्यामुळे यंदा देशात साखरेचे मोठया प्रमाणात उत्पादन झाल्याने साखर निर्यात वाढणे अपेक्षित आहे. मात्र केंद्र सरकारच्या देशातील साखरेच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर निर्यातीवर बंदी घातली आहे. याचा मोठा फटका साखर उत्पादक कारखान्यांना आणि पर्यायाने शेतक़र्‍यांना बसणार आहे. मात्र यामुळे साखरेचे दर नियंत्रणात राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version