Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आयएमआरचे सिनर्जी स्नेहसंमेलन उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई सोसायटीच्या आय.एम.आरच्या सिनर्जी २०१८-१९ या वार्षिक महोत्सवाचा गुरुवारी समारोप झाला. यात माधुरी बिर्ला हिला स्टुडंट ऑफ द इयरने गौरवण्यात आले.

या दोन दिवसीय संमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सीए पल्लवी मयूर, केसीई सोसायटीचे अकॅडमिक डायरेक्टर प्रा.डॉ. डी.जी. हुंडीवाले, आयएमआरच्या संचालिका प्रा.डॉ. शिल्पा बेंडाळे उपस्थित होत्या. यशस्वी आयोजनासाठी संचालक डॉ. शिल्पा बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वर्षा पाठक, प्रा. रूपाली नारखेडे, प्रा.विवेक यावलकर, प्रा.उत्कर्ष चिरमाडे, प्रा. रंजना झिंजोरे, प्रा.अमोल पांडे, प्रा.डॉ.शुभदा कुलकर्णी, प्रा.स्वप्नील काटे, प्रा. नितीन खर्चे, प्रा. तनुजा फेगडे , प्रा.विजय पाटील, प्रा. श्‍वेता चोरडिया, प्रा.चंद्रशेखर वाणी, प्रा.प्रकाश बारी, प्रा.पराग नारखेडे, प्रा.एस.एन. खान, प्रा. तेजस सोनवणे यांनी सहकार्य केले.

स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात बेस्ट स्टुडंट म्हणून माधुरी बिर्ला हिला सन्मानित करण्यात आले. तर एमबीए विभागातून शुभम तोष्णीवाल, आयएमबीए मयूर नेरकर, एमसीए काजल चोपडे, आयएमसीए बिना ठाकुरदास पार्पियानी, एमसीएम केतन बारी, एमपीएम राहुल तिवारी, बिबिएस विकास रोकडे, बीबीएम ई-कॉम सोनल भानुशाली यांना सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version