Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आदित्य स्कूलमध्ये रंगले स्नेहसंमेलन

रावेर प्रतिनिधी । येथील माऊली फाउंडेशनद्वारा संचालित आदित्य इंग्लिश स्कुलचे स्नेहसंमेलन नुकतेच अतिशय उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके हे होते. सरस्वती पूजन नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन व पो. नि. रामदास वाकोडे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून आयडीबीआय बँक अधिकारी अमित बागडे, व्यंकटेश ट्रेडर्स संचालक ललित चौधरी, वीज वितरण कंपनीचे भिकाजी साळुंके दीपक नगरे आदी मान्यवर उपस्थित होते

प्रास्ताविकात प्राचार्य संजय पाटील यांनी शाळेच्या विकासाचा आढावा देत विद्यार्थी घडविण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम सांगितले. पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक डॉ आर एस पाटील ,सौ सुमनताई पाटील अध्यक्ष डॉ संदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भक्तीगीत, देशभक्ती गीते, सिनेमा गीत नृत्य, शिवाजी महाराज आणि माँ जिजाऊ यांच्या भेटीचा ड्रामा आदी प्रात्यक्षिके सादर करून पालक असलेले प्रेक्षकांना मंत्र मुग्ध करून सोडले.

वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांनी मनोगतातून पर्यावरण हितासाठी माऊली फौंडेशन सातत्याने कार्य करत असल्याचे सांगितले. पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरतांना सायबर क्राईम चा अभ्यास करणे आवश्यक आहे. अध्यक्षीय भाषणात विलास बोडके यांनी सांगितले की, बालवयात त्यांच्या अंगी असलेले कला गुण ओळखून त्यांना संधी उपलब्ध करवून देणारी संस्था अत्यंत कौतुकास्पद आहे.

याच सांस्कृतिक कार्यक्रमात शासकीय मासिक लोकराज्यचा स्टॉल लावण्यात आला होता तेथील अंक बघण्यासाठी आणि वार्षिक माहिती घेण्यासाठी पालकांनी भेट दिली तर काहींनी तात्काळ वार्षिक वर्गणी भरली. शाळेचे अध्यक्ष डॉ संदीप पाटील यांनी आपल्या शाळेतील सर्व कर्मचारी आणि शिक्षक यांची एकत्रित वार्षिक वर्गणी भरून १०० टक्के शाळा लोकराज्य करवून घेतली.

सूत्रसंचालन गौरंगिनी डोळसकर यांनी केले तर आभार रुपाली सोनार यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्या सौ मनीषा सोहनी, निलेश पाटील, राहुल पाटील, नामदेव सपकाळे, ज्ञानेश्‍वर धनगर, ईश्‍वर सोनार, राकेश गडे, कल्पना पाटील, मीनल पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

Exit mobile version