Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गॅस गळतीने हाहाकार : सहा मजुरांचा मृत्यू; २० जण गंभीर

सुरत वृत्तसंस्था | येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका केमिकल टँकरमधून गॅस गळती झाल्याने ६ मजुरांचा मृत्यू झाला. तर २० जण गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

सुरत येथील सचिन जीआयडीसी भागात केमिकलने भरलेल्या टँकरमधून केमिकल लीक झाल्याने ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० हून अधिक मजुरांचा श्वास गुदमरल्याने त्यांना सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
औद्योगीक वसाहतीमधील राजकमल चिकडी प्लॉट क्रमांक ३६२ च्या बाहेर १० मीटर अंतरावर उभ्या असलेल्या केमिकलच्या टँकरपासून १० मीटर अंतरावर मजूर झोपले होते. या घटनेत जखमी झालेल्या २० हून अधिक जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. टँकरमधून केमिकल टाकले जात असताना हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. सध्या ८ जण व्हेंटिलेटरवर आहेत. एक टँकर चालक नाल्यात विषारी केमिकल टाकत होता. यादरम्यान त्यातून विषारी केमिकलची गळती सुरू झाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version