Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गतीमंद बालकांच्या गरबा नृत्याने वाढवला ‘जल्लोष’

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथे मानसिंगका मीलच्या प्रांगणात गेल्या २६ सप्टेंबर पासून सुरू असलेल्या सुमित किशोर आप्पा पाटील प्रेझेंट “जागर शक्तीचा -उत्सव भक्तीचा” गरबा दांडिया जल्लोष – २०२२ मध्ये शनिवार १ ऑक्टोबर रोजी स्व. कालिंदीबाई पांडे गतीमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हजेरी लावून आपल्या नृत्य कलेचे प्रदर्शन करत गरबा खेळून आपल्या नटखट व लक्षवेधी हालचाली दाखवल्याने खऱ्या अर्थाने जल्लोष चा आनंद वाटला.

गतीमंद बालकांच्या गरबा नृत्यास उपस्थित लहान व मोठ्या गटाचे खेळाडू तसेच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत व आदिशक्ती देवीचा जयघोष करत सात व दाद दिली. त्यामुळे सर्वच खेळाडूंचा उत्साह वाढला. शनिवार १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आदिशक्तीचा जयघोष व आरतीने गरबा दांडियाला प्रारंभ झाला. बाल गट, मोठा गट व प्रेक्षकांसाठी जनरल राऊंड स्वतंत्रपणे झाले. बहुतांश स्पर्धकांनी पॅन्ट, कुर्ता, टोपी, दांडिया यांच्यावर केलेली विद्युत रोषणाई कमालीची आकर्षक व लक्षवेधी ठरली. नाशिक येथील अमोल पालेकर यांच्या सूर व संगीताची मैफल, दोंडाईच्या येथील उजाला डिजिटल साऊंडचा ठेका, फटाक्यांची होणारी अतिशबाजी, आदिशक्तीचा जयघोष, रंग रंगीबेरंगी पताका व धुराळ्याची उधळण अशा प्रसन्न वातावरणात स्पर्धा रंगली.

याप्रसंगी आमदार किशोर पाटील, स्पर्धेचे आयोजक आमदार पुत्र सुमित पाटील, माजी नगराध्यक्ष तथा आमदारांच्या सौभाग्यवती सुनिता पाटील, स्पर्धेचे प्रायोजक आशिर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दीकर, पिपल बँकेच्या संचालिका मयुरी बिल्दीकर, आदित्य बिल्दीकर, रवी केसवानी, अनुष्का बिल्दीकर, आमदारांच्या कन्या डॉ. प्रियंका पाटील, एमएसपी बिल्कॉमचे संचालक मनोज पाटील यांचे पुत्र साई मनोज पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, नगरसेवक वाल्मीक पाटील, सतीश चेडे, शहर प्रमुख किशोर बारावरकर, सुनिल पाटील, सुमित सावंत, एकनाथ पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या मंदा पाटील, वर्षा पाटील, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, अरुण ओझा, मुन्ना गौड, ग्रीन अॅपल इव्हेंट्सचे संदीप महाजन, राहुल पाटील, भूषण पेंढारकर, सागर शेख, जितेंद्र काळे, धनराज पाटील, अतुल चित्ते, मनोज बडगुजर, प्रा. डॉ. वैष्णवी महाजन, ङॉ. कादंबरी महाजन आदि यावेळी उपस्थित होते.

परिक्षक म्हणून प्रीती बोथरा, शितल महाजन, उर्वशी मोर, दुष्यंत खंडेलवाल ,मालवीन सालोमन यांनी काम पाहिले. नवरात्रीच्या रंगाप्रमाणे मॅचिंग पेहराव केलेल्या महिलांच्या नावांचा ड्रॉ काढून त्यांना पैठणी देण्यात आली. तसेच आमदार किशोर पाटील यांच्या विकास कामांवर आधारित प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. दिपा राजपूत, शुभम खैरनार, अक्षरा येवले, प्रीती पाटील, भालचंद्र अमृतकर, शितल वानखेडे, नंदा पवार, ज्योती भोई हे पैठणी व बक्षिसांचे मानकरी ठरले. मान्यवरांच्याहस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आली.

या स्पर्धेसाठी सुमारे ७०० स्पर्धकांची रेकॉर्ड ब्रेक नोंदणी झाल्याने नोंदणी बंद करण्याचा आयोजकांनी निर्णय घेतला. त्यामुळे बहुतांश खेळाडूंचा हिरमूस झाला. स्पर्धेसाठी ग्रीन एप्पल इव्हेंटने सुयोग्य नियोजन केल्याने हजारो प्रेक्षकांना स्पर्धेचा आनंद लुटता येत असून खेळाडूंना देखील आपल्या नृत्यकलेचे सर्वार्थाने प्रदर्शन करणे शक्य होत आहे. सुमित पाटील यांचे स्केच चित्र रेखाटणाऱ्या विद्यार्थ्यांस १ हजार रुपयांचे, गतिमंद बालकांच्या नृत्यकलेसाठी ५१००/- रुपयांचे तर सुर व संगीताची उत्कृष्ट जुगलबंदी साकारल्याने अमोल पालेकर यांना २१००/- रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.

या स्पर्धा ४ ऑक्टोबर पर्यंत चालणार असून सोमवार ३ ऑक्टोबर रोजी सारेगमप विजेती वैशाली माडे यांच्या गाण्याची मैफिल रंगणार असून माडे उपस्थित खेळाडूंमध्ये गरबा व दांडिया खेळणार आहेत. मंगळवार ४ ऑक्टोबर रोजी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हजेरी लावणार असून त्यादेखील आपल्या अभिनय व नृत्य कलेची उधळण करणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना दोन एक्टिवा (मोपेड), दोन वॉशिंग मशीन, दोन फ्रीज, दोन मोबाईल, दोन टॅब, दोन सायकली अशा भरीव बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. गरबा दांडियाचा प्रेक्षकांनी मनसोक्त आनंद लुटावा व सहकार्य करावे असे आवाहन, आ. किशोर पाटील, मुकुंद बिल्दीकर, मनोज पाटील, सुमित पाटील, आदित्य बिल्दीकर, डॉ. प्रियंका पाटील, अनुष्का बिल्दीकर यांचेसह ग्रीन ॲपल इव्हेंट्सच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Exit mobile version