Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गणेशवाडी परिसरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गणेशवाडी परिसरातील पंचमुखी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून एकाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सतीष प्रल्हाद नेमाडे (वय-५०) रा. पंचमुखी अपार्टमेंट, गणेशवाडी जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. नास्तागाडी लावून आपला उदरनिर्वाह करतात. ६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांनी त्यांची मालिकीची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीएस ५०५५) ही अपार्टमेंटमध्ये पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याचे गुरूवार ७ जुलै रोजी उघडकीला आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर रविवार १० जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मिलींद सोनवणे करीत आहे.

Exit mobile version