Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गंगापुरी गावाला वाघूर बॅकवाटरचा वेढा; पुनर्वसन करण्याची मागणी

jamner news 2

जामनेर (प्रतिनिधी)। तालुक्यातील गंगापुरी गावाला वाघूर धरणाचे बँकवाटर मागे फिरल्याने गावाला पाण्याचा वेढा पडला असून फक्त मुख्य रस्त्यावरच यायला जायला वाव असल्यामुळे गंगापुरी रहिवाशांनी जामनेर तहसिलदार यांच्याकडे आपली कैफियत मांडत. गावाचे इतर ठिकाणी पुनर्वसन व्हावे अशी मागणी निवेदनाद्वारे शासनाकडे केली.

वाघूर धरण पुर्ण क्षमतेने भरूनही धरणाचे बँकवाटरचे पाणी गंगापुरी गावात शिरत नाही कारण गावाची भौगोलिक स्थिती नुसार गाव थोडे उंचावर आहे.धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर गावाला पाण्याचा तिन्ही बाजूने वेढा पडतो. फक्त गावाचा मुख्य रस्ताच येण्या जाण्यासाठी सुरू असतो.मात्र यामुळे धरणाच्या आसपास जंगलात असलेले वन्यजीव यांची भिती व सरपटणारे प्राणी यांच्या भीतीमुळे गावकरी दहशतीखाली राहतात.तसेच गावाच्या मधोमध वरच्या भागातून उच्च दाबाची विद्युत वाहीनीचे तार गेले असल्याने त्याचाही धोका असल्याचे गावकऱ्यांनी या वेळी तहसीलदार शेवाळे यांच्याकडे आपल्या समस्या मांडत. तसे लेखी निवेदन शासनाकडे सादर करून नवीन ठिकाणी आमचे पुनर्वसन करून द्यावे अशी मागणी लावून धरली. गत २००८ पासून गंगापुरी रहिवाशांचा गाव पुनर्वसनासाठी शासनाशी लढा सुरु असून.पुनर्वसन होणार की नाही होणार या विवंचनेत गंगापुरी रहिवासी आहे.तसेच या ठिकाणी अदिवासी विकास प्रकल्पा यावल अंतर्गत शासकीय निवासी आश्रमशाळा असून त्यात प्राथमिक आणि माध्यमिक इय्यतेचे सुमारे पाचशे विद्यार्थी शिक्षण घेतात.याचाही शासनाने गांभीर्याने विचार करून लवकर गावाचे इतरत्र योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे.जेणेकरून भविष्यात काही जिवीत हानी होणार नाही याचाही विचार व्हावा.अशी सुचनावजा मागणी यावेळी गावकर्यांनी केली.

Exit mobile version