Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भिवंडीत विवाहितेवर सामूहिक बलात्कार ; दिरासह तिघांना अटक

भिवंडी (वृत्तसंस्था) शहरातील भिवंडी रेल्वे स्टेशन परिसरातील निर्जन झुडपात एका विवाहितेवर चौघा नराधमांनी आळीपाळीने पाशवी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या दिरासह तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, नारपोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका सोसायटीत 25 वर्षीय विवाहित पीडितेस तिच्या छोट्या दिराने फसवून भिवंडी रेल्वे स्टेशन नजीकच्या निर्जन ठिकाणी आणले. त्या ठिकाणी त्याने आपल्या वहिनीवर बलात्कार केला. पीडित महिला त्यास विरोध करीत असल्यामुळे ओरडण्याचा आवाजाने त्या भागात नशा करत बसलेले तीन युवक त्या ठिकाणी आले. मग त्यांनीही असहाय्य पीडितेला धमकावून आळीपाळीने पाशवी बलात्कार केला. यानंतर पीडितेने आपली सोडवणूक करून घेत थेट नारपोली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. दोन अल्पवयीन आरोपींसह दोघांना ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version