Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गणेश नाईक भाजपमध्ये; नवी मुंबई महापालिकेत सत्तांतर

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे मातब्बर नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांच्यासोबत नवी मुंबई महापालिकेतील त्यांच्या समर्थक नगरसेवकांनीही हाच कित्ता गिरवल्यामुळे तेथील राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आली आहे.

माजी मंत्री गणेश नाईक हे भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त कधीपासूनच समोर आले होते. त्यांनी मध्यंतरी घेतलेल्या समर्थकांच्या मेळाव्यातून हाच सुर उमटला होता. या पार्श्‍वभूमिवर, आज गणेश नाईक यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत नवी मुंबई महापालिकेतील त्यांच्या ४८ समर्थकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे तेथील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली आहे. नाईक यांच्या प्रवेशाने नवी मुंबईत भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version